२१ जून २०२५ रोजी “हरित योग दिन” च्या निमित्ताने वेतोरे ग्रामपंचायत मार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात सरपंच सौ. प्राची नाईक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
प्रकृती आणि पर्यावरण यांचे संतुलन राखण्यासाठी योगासोबतच वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. विविध प्रकारची फळझाडे व छायादायक झाडांची लागवड ग्रामपंचायत कार्यालय परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली.
“योगासोबत निसर्गसंवर्धन” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न यामागे होता.
🌳 झाडे लावा – जीवन वाचवा! 🌿
– वेतोरे ग्रामपंचायत

Recent Comments